येस बॅंकेचा खातेधारकांना दिलासा

येस बॅंकेचा खातेधारकांना दिलासा

येस बँकने खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. येस बॅंकेने शनिवारी रात्री कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्याची मुभा दिली आहे.

अडचणीत सापडलेल्या येस बँकेने काही दिवसांपूर्वी कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध घातले होते.

खातेधारकांना कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकतात, असं येस बँकेच्यावतीने ट्विट केलं आहे.

गुरुवारी रिझर्व्ह बॅंकने सर्व सेवांवर प्रतिबंध घातले होते. तसेच सर्व ऑनलाईन सेवांवर देखील प्रतिबंध घातले होते.

यानंतर देशातील अनेक येस बँकेच्या खातेधारकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. तसेच पैसे काढण्यासाठी एटीएमच्या आणि बँकेच्या बाहेर लांब रांगा लावाव्या लागल्या होत्या.

दरम्यान खातेधारकांना एका महिन्यात जास्तीत जास्त ५० हजार रुपये काढण्याची मर्यादा आहे. येस बॅंकेचे देशभरात हजारापेक्षा अधिक बँक शाखा आहेत. तर १ हजार ८०० पेक्षा अधिक एटीएम आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version