Shivsena MP Meet Amit Shah : खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदार शिंदेसेनेच्या गळाला? श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांनी घेतली शाहांची भेट

राज्यात पुन्हा शिंदेंच्या ऑपरेशन 3 चे वारे वाहू लागल्याची चर्चा सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी अमित शाहांची भेट घेतल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.
Shivsena MP Meet Amit Shah : खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदार शिंदेसेनेच्या गळाला? श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांनी घेतली शाहांची भेट

राज्यात पुन्हा शिंदेंच्या ऑपरेशन 3 चे वारे वाहू लागल्याची चर्चा सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी अमित शाहांची भेट घेतल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. नुकतेच शिंदेंच्या ऑपरेशन टायगरदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

संजय पाटील, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे खिंडार पडले. असं असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगरच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

हेही वाचा- Rohit Pawar On MHT-CET Exam Scam : तलाठी भरतीपासून MHT-CET पर्यंत मोठा घोळ? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ; परीक्षा व्यवस्थेवर उठले गंभीर प्रश्न

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, नागेश पाटील आष्टीकर, संजय पाटील यांच्यासह विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या खासदारांनी अमित शाहांची ही दुसऱ्यांदा भेट घेतली आहे.

दरम्यान या भेटीनंतर राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सुरू होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. या भेटीमागचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. मात्र ठाकरेंच्या सहा खासदारांनंतर आता खासदारांपाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदारही फुटणार अशी चर्चा सुरू झाली आहे. आता राज्यात ऑपरेशन टायगरचा पुढील भाग सुरू होणार आहे का? याच्या चर्चेला या भेटीनंतर उधाण आलं आहे.  

हेही वाचा- Jay Pawar: ‘प्रत्येक महिलेच्या सन्मानाच्या रक्षणासाठी…’, सुनेत्रा पवारांवरील वक्तव्यावर जय पवारांनी व्यक्त केलं मत

शिवसेना पक्षचिन्हाची सुनावणी पुढे ढकलली
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाच यावर आज मंगळवारी 4 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र ती आता बुधवारी 5 ऑगस्ट रोजी ढकलण्यात आली आहे. बुधवारी दुपारी 2 वाजता यासंदर्भातली सुनावणी सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे. याचपार्श्वभूमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांची बैठक बोलवली होती. राज्य मंत्रिमंडळ बैठकी आधी सर्व शिवसेनेचे मंत्री बैठकीला हजर होते. यावेळी बैठकीत प्रामुख्याने सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीवर आणि येणाऱ्या निकालावर खलबते झाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version