कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शाळा सुरु होणार?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शाळा सुरु होणार?

देशात कोरोनाची लाट हळूहळू ओसरत असल्याने विविध राज्यांनी टप्प्याटप्प्याने का होईना शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र असे असले तरी अद्याप देशातील ७६ टक्के पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे लोकल सर्कल या संस्थेने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणातून समोर आले आहे. जोपर्यंत आम्ही राहत असलेल्या ठिकाणचे संपूर्ण लसीकरण होऊन कोरोना संख्या शून्यावर येत नाही किंवा मुलांना लस मिळत नाही तोपर्यंत मुलांना शाळांमध्ये पाठविण्याचा धोका आपण पत्करू शकत नसल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी दिल्या आहेत. देशाच्या २९३ हून अधिक जिल्ह्यांतून १० हजारांहून अधिक पालकांनी मत व्यक्त केले.

 

३७% पालकांनी मुलांना लस मिळत नाही तोपर्यंत शाळेत पाठविणार नसल्याचे उत्तर दिले.

२०% पालक शाळा सुरू होतील तेव्हा मुलांना शाळेत पाठवायला तयार आहेत.

२४% पालकांनी आपल्या व आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे म्हटले.

१५% पालकांनी आपल्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचे म्हटले.

४% पालक मत सांगू शकले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version