Lohagad Accident News : अपघात नव्हे तर घातपात! केतनच्या प्रेमानेच रचला त्याच्या हत्येचा कट; लोहगडवरील मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण

गुरुवारी 18 जून रोजी 24 वर्षीय केतन विशाल अग्रवाल या तरुणाचा लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावर फिरत असताना तोल जाऊन मृत्यू झाला. दरम्यान लोहगड किल्ल्यावर झालेल्या या घटनेला आता वेगळंच वळण मिळाले आहे.
Lohagad Accident News : अपघात नव्हे तर घातपात! केतनच्या प्रेमानेच रचला त्याच्या हत्येचा कट; लोहगडवरील मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण

गुरुवारी 18 जून रोजी 24 वर्षीय केतन विशाल अग्रवाल या तरुणाचा लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावर फिरत असताना तोल जाऊन मृत्यू झाला. केतन हा त्याच्या होणाऱ्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त लोहगडावर ट्रेकिंगला गेला होता. तिथेच तिचा वाढदिवस देखील साजरी करणार होता. मात्र तेथील ओलसर भागावरून घसरून तो थेट खाली कोसळला त्याला गंभीर दुखापत झाली होती, ते पाहून केतन याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आयुष्याच्या नव्या प्रवासाची स्वप्ने उराशी बाळगलेल्या केतनचा काळाने घात केला. 

दरम्यान लोहगड किल्ल्यावर झालेल्या या घटनेला आता वेगळंच वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केतनचा विवाह या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उदयपूर येथे 14 कोटी रुपये खर्चून अत्यंत आलिशान पद्धतीने होणार होता. यासाठी विमान प्रवासाची तिकिटे तसेच एका आलिशान पॅलेस हॉलचे बुकिंगही करण्यात आले होते. मात्र, त्याच्या नियोजित वधूने (होणाऱ्या बायकोने) तिच्या मित्रासह आणि इतर साथीदारांसह मिळून केतनला दरीत ढकलण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा- Pune News : येत्या 14 तारखेला लग्न, मात्र संसाराची स्वप्ने उराशी बाळगलेल्या तरुणावर काळाचा घात; अन् आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले

या कटात एकूण 8 जणांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, केतनच्या वडिलांच्या तक्रारीवरून लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केतन अग्रवाल हा पुणे जिल्ह्यातील गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीचा रहिवासी होता. लग्नाच्या आनंदमय वातावरणात अचानक आलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अगरवाल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असलेल्या केतनच्या या मृत्यूमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस तांत्रिक माहिती आणि पुराव्यांच्या आधारे पुढील तपास वेगाने करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version