सोमय्यांच्या निशाण्यावरचे ३ मंत्री कोण?

सोमय्यांच्या निशाण्यावरचे ३ मंत्री कोण?

  ठाकरे सरकारमधील ३ मंत्र्यांचे घोटाळे उघड करण्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे सोमय्यांच्या निशाण्यावरचे ३ मंत्री नेमके कोण आहेत, याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चेला उधाण आले आहे. आता किरीट सोमय्या यांनी नवे ट्विट करत महाविकासआघाडी सरकारची चिंता वाढवली आहे.

  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत सांगितले की, ‘मी ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आयकर विभाग सीबीडीटी, ईडी, सहकार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तसेच १० नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकारमधील मंत्र्याची मुंबई येथे तक्रार दाखल करणार आहे. पुढील काही आठवड्यांत महाविकास आघाडी सरकारमधील ज्या ३ मंत्र्यांचे घोटाळे काढणार त्यापैकी हा पहिला खुलासा, अँक्शन.’

  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version