Manoj Jarange Patil : इथे रखरखत्या उन्हात जरांगेंच उपोषण सुरु, तिथे आंदोलकांनी थेट समृद्धी महामार्ग अडवला

आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू झाले असून जालना या ठिकाणी मोठा पाठिंबा मिळत आहे.
Manoj Jarange Patil : इथे रखरखत्या उन्हात जरांगेंच उपोषण सुरु, तिथे आंदोलकांनी थेट समृद्धी महामार्ग अडवला

आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातून मराठा समाजाची हळूहळू गर्दी होऊ लागली आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावेळी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणा शेजारी एक रिंगण आखले आहे. या रिंगणाच्या आत कोणीही बांधवांनी येऊ नये असं आव्हान त्यांनी केलं आहे.

हेही वाचा- Manoj Jarange Patil : कंठ दाटला, डोळ्यात अश्रू… उपोषणाला जाताना मनोज जरांगे भावूक

मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू झाले असून जालना या ठिकाणी मोठा पाठिंबा मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीत उपोषणाला बसतच असतानाचं दुसरीकडे मराठा समाजाची आता आक्रमक होताना दिसत आहे. जालन्यातील नाव्हा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देत रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे.

अचानक झालेल्या या रस्ता रोको आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत घटनास्थळी समृद्धी महामार्ग पोलिसासह जालना पोलीस दाखल झाले असून आंदोलकांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावर मोकळा करण्याची विनंती केली असून काही आंदोलकांना ताब्यात ही घेतलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version