बाजारातील पॅमेंट अॅप्स नां आता वॉट्सअॅपची टक्कर

बाजारातील पॅमेंट अॅप्स नां आता वॉट्सअॅपची टक्कर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

व्हॉट्स अॅप नेहमीच आपल्या युजर्सना खुश करण्यासाठी तत्पर ठरला आहे. व्हॉट्स अॅपने आपल्या युजर्सला खूश करण्यासाठी आता आणखी एक नवी योजना आणली आहे. मेसेजिंगच्या दुनियेत अव्वल स्थानी असलेल्या व्हॉट्स अॅपद्वारे युजर्सना आता डिजिटल पेमेंट देखील करता येणार आहे. व्हॉट्सप अॅपने भारतात पेमेंट एनेबल्ड बिटा व्हर्जन आणलं आहे. पण सध्या तरी हे व्हर्जन ठराविक यूजर्सपुरतेच मर्यादित आहे. 

प्राइम व्हेंचर पार्टनर्सच्या संजय सॅमी यांनी टि्वटवरून याची माहिती दिली आहे. की हे बिटा व्हर्जन iOS वरही उपलब्ध झालंय. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या डिजीटल पेमेंट्ससाठी असणाऱ्या मध्यवर्ती संस्थेच्या माध्यमातून ही सुविधा बँकांच्या सहकार्याने सुरू करण्यात येत आहे. ही पेमेंट सुविधा ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI)’वर आधारित असेल. सवीस्तर माहिती म्हणून त्यांनी या टि्वटमध्ये पैसे पाठविण्याची पद्धत दाखवली आहे.

 

पैसे स्वीकारणाऱ्याची आणि पैसे पाठविणाऱ्याची ओळख पटविण्यात व्हॉट्सअॅप मुख्य भूमिका बजावेल अशी आशा बाळगली तरीही काय वावगं ठरणार नाही. व्हॉट्सअॅपची ही पेमेंट्सची नवीन सुविधा बँकांसोबत जोडलेली असणार आहे. त्यामुळे युझर्सच्या बँक अकाउंटचीही ओळख पटेल आणि शेवटी यूपीआयद्वारे आर्थिक व्यवहारांसाठी मदत देखील होईल हाही त्यामागचा हेतू आहे. पेटीएम आणि गुगल तेजसारख्या पेमेंट गेटवे प्रमाणे व्हॉट्स अॅपलाही उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.तसंच व्हॉट्स अॅपच्या या अपडेटमुळे पेटीएम आणि गुगल तेजसारख्या पेटीएम अॅपला व्हॉट्स अॅपची जोरदार टक्कर मिळेल हे नक्कीच.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version