शिवसेना पक्षप्रमुखांच्या इशाऱ्याचे काय झाले?

शिवसेना पक्षप्रमुखांच्या इशाऱ्याचे काय झाले?

प्रतिक्षेत असलेला विधान परिषद निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. विधान परिषद निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा चमत्कार पाहायला मिळाला आहे. सर्वांचे लक्ष असलेल्या भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरशीची लढत झाली असून प्रसाद लाड यांनी बाजी मारली आहे. अशाप्रकारे, विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे सर्व ५ उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे २, शिवसेनेचे २ आणि काँग्रेसचा १ उमेदवार विजयी झाले आहेत.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दावा केला होता की, विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटणार नाहीत. मात्र, विधानपरिषदेत शिवसेनेची ३ मते फुटली आहेत. निवडणुकीत शिवसेनेला ५६ मतांपैकी ५३ मते मिळाली आहेत. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुखांच्या इशाऱ्याचे काय झाले? असा सवाल उपस्थित होत आहे.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड विजयी झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले आहेत. तसेच काँग्रेसचा एक उमेदवार भाई जगताप विजयी झाले आहेत. मात्र, काँग्रेसचा दुसरे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे.

काँग्रेसची तीन मते फुटली

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची तीन मते फुटली आहेत. काँग्रेसला स्वत:ची मते मिळवताना मारामार करावी लागली. काँग्रेसला ४४ पैकी ४१ मते मिळाली आहेत. अखेर, काँग्रेसचे भाई जगताप यांचा विजय झाला असून चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.

राष्ट्रवादीला क्षमतेपेक्षा जास्त मते

राष्ट्रवादी काँग्रेसला क्षमतेपेक्षा जास्त मते मिळाली आहे. राष्ट्रवादीला ५७ मतं पडली असून हक्काच्या मतांपेक्षा ६ मतं जास्त पडली आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version