Weather Update: ढग दाटले, पावसाची चाहूल लागली! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; IMDचा आजचा अंदाज काय?

राज्यातील अनेक भागांत पुन्हा पावसाने जोरदार आगमन केलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे.
Weather Update: ढग दाटले, पावसाची चाहूल लागली! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; IMDचा आजचा अंदाज काय?

राज्यातील अनेक भागांत पुन्हा पावसाने जोरदार आगमन केलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील घाटमाथा परिसरात पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून या भागात कोणताही विशेष हवामान अलर्ट देण्यात आलेला नाही. 

दरम्यान मुंबईत पालघर, ठाणे आणि पनवेलमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे आणि दमट राहण्याचा अंदाज असून, आकाश ढगाळ राहण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर या घाटमाथा परिसरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत  हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हेही वाचा- Gold-Silver Rate : सराफ बाजारात मोठी उलथापालथ! सोन्याच्या भावात विक्रमी तेजी, चांदीनेही दिला मोठा झटका; जाणून घ्या नवे दर

तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड या मराठवाड्यातील भागांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस या भागात हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे याठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात सध्या 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही देण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत सध्या कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. 

तर दुसरीकडे धुळे जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने कपाशी व मक्यासारखी पिके धोक्यात आली आहेत. पिकांच्या वाढीच्या काळातच जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे कुंडाणे शिवारातील बागायती शेतकऱ्यांनी पिके वाचवण्यासाठी कृषी पंपांच्या साह्याने पाणी देण्यास सुरुवात केली आहे. ऐन मोसमात पाणी द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, बळीराजा आता जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

नाशिकच्या मनमाड नांदगाव परिसरात गेल्या महिन्यापासून पाऊस नसल्याने मका बाजरी व भाजीपाला पिकांना फटका बसत आहे सध्या पिकांना पाण्याची गरज असताना विहिरींनी देखील तळगाटला आहे त्यामुळे भाजीपाला पिकांना देखील फटका बसत आहे सध्या चांदवड मनमाड परिसरात विहिरींनी देखील तळगाटला आहे त्यामुळे सर्वच पिकांना आता पावसाची प्रतीक्षा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version