Weather Update : बंगालच्या उपसागरात हालचाली वाढल्या, महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना याचा परिणाम भोगावा लागत आहे. अनेक भागांत अपेक्षित असा दमदार पाऊस होत नसून, केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतोय.
Weather Update : बंगालच्या उपसागरात हालचाली वाढल्या, महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना याचा परिणाम भोगावा लागत आहे. अनेक भागांत अपेक्षित असा दमदार पाऊस होत नसून, केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. तर काही ठिकाणी पावसाने कायमचा घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. अशातच  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागांत पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.  

परिणामी पावसाच्या स्थितीत पुन्हा एकदा बदल होऊन पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता बळावली आहे. यादरम्यान मुंबईसह पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. तर कोकणात सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- Weather Update: श्रावणात पावसाचा लपंडाव सुरूच! श्रावणसरी ओसरल्या, मात्र महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी हवामान कोरडे आणि दमट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ आणि दमट वातावरण कायम असून पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सध्या जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विशेष पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. यावेळी वर्ध्यात पंधरा दिवसानंतर रिमझिम पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत असून कपाशी, सोयाबीन, तूर पिकाला दिलासा मिळाला आहे. पंधरा दिवस उघाड दिल्यानं शेतीची कामे थांबली होती. तसेच वखरणी, डवरणी, खुरपणी व खत देण्याच्या कामावर परिणाम झाला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version