Weather Update : राज्यात पुढील 5 दिवस पावसाचे थैमान! वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची मुसंडी; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

पावसाने गेल्या काही दिवसांपासून दांडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अशातच पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा नवा अंदाज वर्तवलाय.
Weather Update : राज्यात पुढील 5 दिवस पावसाचे थैमान! वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची मुसंडी; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

जून महिन्याच्या सुरुवातीला जोर धरलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून दांडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अशातच पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे. 19 जुलै ते 23 जुलै दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच पालघर, ठाणे आणि नवी मुंबई या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.  

त्याचसोबत उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक येथे जोरदार पाऊस हजेरी लावली आहे. तर हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्यांत जोरदार पावसाची शक्यता नसून ढगाळ आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा- Maharashtra Weather: उकाड्यानंतर अखेर दिलासा! राज्यात पुन्हा पावसाची एंट्री; 'या' भागांत मुसळधार सरी

मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकाडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट देण्यात आला आहे. सलग तीन दिवसांपासून नागपुरात पावसाची हजेरी लागणार आहे.

नियमित सरींमुळे उकाडा आणि दमट वातावरणापासून नागपूरकरांना दिलासा मिळणार असून हवामान विभागानुसार शनिवारी सकाळी 5.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तसेच आज दुपारनंतर पुन्हा पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळणार असून सायंकाळी आणखी 4 मिमी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागांत जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या सरी असतील. तसेच तापमानात घट झाल्याने उष्णता आणि दमटपणापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी आज दिवसभरात एकूण 9.4 मिमी  पावसाची नोंद करण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास पिकांच्या वाढीस मोठी मदत होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version