शिंदे गटाचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेतून बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदार बाहेर पडले. त्यांच्यासोबत मी पण हो तो. मी पक्षातून गेलो तेव्हा सांगूनच गेलो होतो. मी भगोडा नव्हतो असं गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे.
मी त्यांना सांगूनच बाहेर पडलो होतो, असं सांगतानाच गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. ज्या प्रमाणे अजित पवार यांनी पहाटे पहाटे शपथ घेतली तरी त्यांची चूक त्यांनी दुरुस्त केली होती. दिल्लीत केजरीवाल यांचे आमदार फुटून गेले होते त्यांनी लगेच आपली चूक सुधारून पुन्हा त्यांची मनधरणी करून आपल्या बाजूला करण्यात यश मिळविले होते. तर, सोरेन यांचेही काही आमदार पक्ष सोडून गेले होते त्यांनाही परत आणण्यात त्यांना यश मिळाले.
या ठिकाणीही हे शक्य होते. मात्र या ठिकाणी ऐकण्याची मानसिकता नव्हती, उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न न केल्याचा टोला गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता लगावला आहे. उद्धव ठाकरेंना ग ची बाधा नडली, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. ज्या ताटात खाल्ले त्या ताटात वाईट करायची आपली संस्कृती नाही, मात्र योग्य वेळी आपण उत्तर देणार, असंही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.