पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी केंद्र सरकारचं आरबीआयकडे बोलणं झालं – निर्मला सीतारामन

पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी केंद्र सरकारचं आरबीआयकडे बोलणं झालं – निर्मला सीतारामन

विधानसभा निवडणूक तोंडावर असून सर्व पक्षांनी प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबई दौऱ्यावर असून गुरुवारी पत्रकार परिषद घेत पीएमसी बॅंक घोटळ्याप्रकरणी केंद्र सरकारचा काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. आज पुन्हा निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या सहाय्याने राज्यात कामं पार पडली. पीएमसी बॅंकेबाबत आरबीआयकडे बातचीत झाली असून लवकरात लवकर खातेदारांचे पैसे देण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे.

काय म्हणाल्या निर्मला सीतारामन ?

  • पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी केंद्र सरकारचं आरबीआयकडे बोलणं झालं असून त्वरीत पैसे देण्याच्या प्रयत्नात आहेत.
  • कलम 370 हा देशाच्या सुरक्षेचा विषय असून काश्मीरमधील परिस्थित बदल झाले आहेत.
  • राज्यात पाण्याचा विषय महत्वाचा असून मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • शेतकऱ्यांना पिकांची उत्तम किमंत देणार असून कांदे आणि लसून टिकवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
  • कांदे आणि लसूण टिकावेत म्हणून भामा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधन सुरू आहे. त्यामुळे सरकारला दोष देणे चुकीचे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version