उन्हाळ्यात आपण वेग वेगळ्या प्रकारची फळे खात असतो. त्यातही कलिंगडाची मागणी वाढली आहे. कलिंगड खाल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो. परंतू बऱ्याचदा कलिंगड खाताना आपण नेहमी कलिंगडाचा आतील लाल भाग खातो आणि त्यातील पांढरा भाग तसाच ठेवतो पण तुम्हाला माहिती आहे का कलिंगडाचा पांढरा भाग देखील खूप उपयोगी आहे.
कलिंगडचा पांढरा काढून न टाकता तो भाग खाल्याने आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित होते.त्याचबरोबर वजन कमी करण्यास मदत होते. कलिंगडच्या पांढऱ्या भागापासून अतिशय चविष्ठ भाजी आणि कोशिंबीरसुद्धा करता येते. तर आज कलिंगडाच्या शिऱ्याची पाककृती जाणून घेऊया.
साहित्य :
कलिंगडचा पांढरा भाग, तुप, साखर, दूध , वेलची पावडर
कृती :
सर्वप्रथम कलिंगडचा पांढरा भाग बाजूला काढून एका भांड्यात ठेवावे.त्याचे लहान लहान तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. त्यानंतर कढईत गरम तुप टाकून त्यात मिक्सरमधून बारीक केलेले पांढरे मिश्रण मंद आचेवर शिजवून द्यावे.त्यानंतर मिश्रणाचा रंग बदलल्यावर त्यात दूध टाकून आणखी शिजू द्यावे.
त्यानंतर यामध्ये थोडी साखर आणि वरुन सुका मेवा आणि वेलची पावडर टाकावी. १० मिनिटे शिजवल्यावर तुमचा शिरा तयार होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.