मुसळधार पावसामुळे घरात पाणी

मुसळधार पावसामुळे घरात पाणी

जळगाव शहरातील तांबापुरा महामार्गालगत असलेल्या नाल्याचा प्रवाह बंद झाला. अशात मुसळधार पाऊस पडल्यामुळे गुरुवारी (६ जुलै २०२३) पावसाचे पाणी तांबापुरा परिसरातील रहिवाशांच्या घरात शिरले. यामुळे रहिवाशी नागरिकांचे नुकसान झाले आहे. तलाठी यांच्याकडून पंचनामे करण्यात येत आहेत.

गेल्या अनेक अनेक वर्षांपासून तांबापुरा परिसरातील महामार्ग लगत राहणाऱ्या रहिवाशांना पावसाळ्यामध्ये घरात पाणी शिरल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. महामार्गालगत नाला आहे. या नाल्यातील पाणी जाण्यासाठी जे पाईप महामार्ग लगत बसवण्यात आले आहेत. त्या पाईपमध्ये कचरा अडकल्याने नाल्याचा प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे याठिकाणी दहा मिनिटांचा मुसळधार पाऊस पडताच पाणी घरात शिरले. यावेळी तांबापुरा परिसरातील रस्ते जलमय झाले होते.

दरवेळी पावसाळ्यात याच अडचणींमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते. गुरुवारी दुपारी शहरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अवघ्या दहा मिनिटाच्या पावसामुळे नाल्याचे पाणी निचरा झाला नाही आणि तुंबलेल्या नाल्याचे आणि पावसाचे पाणी येथील रहिवाशांच्या घरात शिरले. पाणी घरात शिरल्याने घरातील धान्य संसार उपयोगी वस्तूचे तसेच कागदपत्रांचे मोठे चे नुकसान झाले आहे. नागरिकांनी प्रत्येक वर्षीच्या या समस्येबाबत संताप व्यक्त केला आहे. तसेच ही समस्या कायमची सोडवावी अशी मागणी केली आहे. समस्या सोडवली नाही तर उपोषण करण्याचा इशारा रहिवाशी पुरुष तसेच महिलांनी दिला आहे.

दरम्यान नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मेहरून परिसरातील तलाठी राजू बाऱ्हे यांनी घटनास्थळी भेट दिली. तलाठी राजू बाऱ्हे यांनी पाणी शिरलेल्या घरांची पाहणी केली. तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार पंचनामाची प्रक्रिया सुरू असून शासकीय नियमानुसार पावसामुळे पाणी घरात शिरून नुकसान झालेल्या येथील रहिवाशांना मदत मिळेल, अशी माहिती सुद्धा तलाठी राजू बाऱ्हे यांनी बोलताना दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version