माघी गणपतीसाठी उर्दू भाषेत पत्रिका छापून दिले खास निमंत्रण

माघी गणपतीसाठी उर्दू भाषेत पत्रिका छापून दिले खास निमंत्रण

जय महाराष्ट्र न्यूज, वसई

 

राज्यभरात गणेश जयंतीचा उत्साह असताना विरारमध्ये या गणेशजयंतीच्या निमित्ताने एका कुटुंबाने धार्मिक सलोख्याचं उदारहण घालून दिलंय.

विरारमधील महिला गणेश भक्तांनी मराठी बरोबरच उर्दु भाषेत निमंत्रण पत्रिका छापून वसई तालुक्यातील सामाजिक सलोखा अधिकच दृढ केला आहे.

विरार पश्चिमेच्या आगाशी-बारीवाडा येथील भोईर कुटुंबातील महिलांनी माघी गणपतीसाठी खास उर्दुत पत्रिका छापली.

वसई विरारमध्ये नेहमीच धार्मिक सलोख्याचं वातावरण पाहायला मिळतं.

एकमेकांच्या धर्माचा आदर करणे, एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत एकोपा जपणं हे नेहमीच इथे पाहायला मिळतं. भोईर कुटुंबाच्या या उपक्रमांचंही सर्वत्र कौतुक होतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version