Vile Parle Fire: विलेपार्ल्यात इमारतीला भीषण आग; चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

मुंबईतील विले पार्ले पश्चिम येथील 12 मजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर भीषण आग लागली. या दुर्घटनेत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी आहेत.
Vile Parle Fire: विलेपार्ल्यात इमारतीला भीषण आग; चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

मुंबईतील विले पार्ले पश्चिम परिसरात मंगळवारी रात्री एका निवासी इमारतीत लागलेल्या आगीने मोठी खळबळ उडाली. 12  मजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर आग लागल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाली. सुरुवातीला आग नियंत्रणात आणण्याजोगी असल्याचे मानले जात होते. मात्र काही मिनिटांतच परिस्थिती गंभीर झाल्याने आगीची पातळी वाढवण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

आगीचा मोठा परिणाम घरातील विद्युत वायरिंग, एसी युनिट, फर्निचर, सोफा, पलंग, फॉल्स सीलिंग आणि स्वयंपाकघरातील वस्तूंवर झाला. जवळपास चार हजार चौरस फुटांच्या परिसरात आग पसरल्याची माहिती आहे. जवानांनी अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर मध्यरात्रीच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.या घटनेत जखमी झालेल्या आठ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींवर कूपर रुग्णालयात, तर इतरांवर नानावटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अग्निशमन दलातील 30 वर्षीय कर्मचारी मनोज सोनावणे आणि 29 वर्षीय शिवम द्विवेदी यांच्यावरही उपचार करण्यात आले असून त्यांना नंतर घरी सोडण्यात आले.

दरम्यान, नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अडीच वर्षांच्या अबीर आणि 23 वर्षीय अंकिता यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पार्थ, हिरेन, यशस्वी आणि अभिषेक या जखमींवर उपचार करण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती स्थिर असून उपचारानंतर काहींना घरी सोडण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version