Vikas Gogawale : महाडमधलं मारहाण प्रकरण, विकास गोगावले अखेर पोलिसांना शरण

नगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे आणि शिवसेना शिंदे गटाचे विकास गोगावले यांच्यात मारहाण झाली होती. अनेक दिवसांपासून फरार असलेले विकास गोगावले शुक्रवारी महाड पोलिसांना शरण आले आहेत.
Vikas Gogawale : महाडमधलं मारहाण प्रकरण, विकास गोगावले अखेर पोलिसांना शरण

महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे आणि शिवसेना शिंदे गटाचे विकास गोगावले यांच्या समर्थकांमध्ये मारहाण झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षाच्या महाड पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले 2 डिसेंबर 2025 पासून फरार होते. कोर्टाने देखील या सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हेही वाचा- Mumbai Mayor : महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर; मुंबईच्या महापौरपदासाठी ‘या’ महिला दावेदारांची नावे समोर

अनेक दिवसांपासून फरार असलेले विकास गोगावले शुक्रवारी महाड पोलिसांना शरण आले आहेत. घडलेल्या घडनेनंतर आरोपी विकास गोगावले हे फरार झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार सहित पोलिसांना आरोपी कसे सापडत नाहीत अशा प्रकारची नोटीस देत जाब विचारला होता. त्यानंतर आज मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे  महाड पोलिसांसमोर शरण झाले. आता महाड पोलिसांकडून विकास गोगावले यांना न्यायालयात हजर केले जाईल. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करणार का, हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version