Pune News : पुण्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट! कुठे पाय धुवून पाणी पितात; तर कुठे लहान मुलींवर अत्याचाराची घटना…

Pune News : पुण्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट! कुठे पाय धुवून पाणी पितात; तर कुठे लहान मुलींवर अत्याचाराची घटना…

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन वेगवेगळ्या भोंदूबाबाचे कारनामे सध्या समोर आले आहेत. त्यातील एका भोंदूबाबाकडे शिष्य पाय धुवून पाणी पितानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालेला आहे. तर दुसऱ्या भोंदूबाबाने मुलींचे शोषण केल्याची घटना समोर आली आहे. भोंदू उमेश तागुंदेचा दुधाने पाय धुतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर भोंदूला पैशांची माळ घालतानाचाही व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. शिष्य पाय धुऊन पाणी पीत असतानाचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. आता पोलिसांकडून यानंतर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. 

हेही वाचा : Supriya Sule : शिवसेना अन् राष्ट्रवादी कुणाची? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं; निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप 

तर दुसऱ्या घटनेत दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करत, लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत लहान मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप स्वप्नील लांडे याच्यावर करण्यात आला आहे. स्वप्नील लांडे हा स्वत:ला गुरुवर्य म्हणवतो. स्वप्नील लांडेने एका अल्पवयीन मुलीला मांडीवर घेऊन तिच्या कानात मंत्र फुंकला आणि तुला कशी अडचण आली तर माझ्याकडे ये, असे त्या मुलीला सांगितले. सध्या पीडित मुलीचे कौन्सिलिंग करण्यात आले आहे. तर आरोपी स्वप्नील लांडे पुण्यातील बिबवेवाडी येथे राहात असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो फरार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version