मुंब्रा स्थानकात ठेवण्यात आलेला ‘तो’ रणगाडा बनला गर्दुल्ल्यांचा अड्डा

मुंब्रा स्थानकात ठेवण्यात आलेला ‘तो’ रणगाडा बनला गर्दुल्ल्यांचा अड्डा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारा वैजयंता रणगाडा हा मुंब्रा स्थानकाच्या बाहेर ठेवण्यात आलाय. शहीद मनीष पितांबरेंच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेल्या या रणगाड्याला आज गर्दुल्ल्यांनी आपला अड्डा बनवलाय.

दारूच्या बाटल्या आणि कचऱ्यांनी वेढल्या गेलेल्या या रणगाडय़ाच्या पोकळींमध्ये अमली पदार्थ दडवण्यात येत असल्याचेही स्पष्ट झालंय. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन वा सुरक्षा यंत्रणांनी कारवाई न केल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या सहकार्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष या संस्थेला हा रणगाडा मिळाला होता. सुरुवातीच्या काळात यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांचे रणगाडा परिसरातील दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका आता या भागातील नियमित ये-जा करणारे रहिवासी करू लागले आहेत.

या रणगाडय़ाचे संरक्षण करण्यासाठी 24 तास सुरक्षा रक्षक ठेवण्यात येतील असे आव्हाड यांनी शुभारंभप्रसंगी सांगितले होते. मात्र सध्या या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून रणगाडा आहे तेथेच गर्दुल्ल्यांचा वावर दिसू लागला आहे. सत्ताधारी पक्षांनी या रणगाड्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर याला पूर्ववत करावं अशी इच्छा रहिवासी व्यक्त करतायंत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version