वापरा ‘हा’ हेअर मास्क; केस होतील सुळसुळीत

वापरा ‘हा’ हेअर मास्क; केस होतील सुळसुळीत

आजकाल बऱ्याच लोकांना केस गळतीची समस्या भेडसावत आहे. खरंच जाड,सुंदर आणि सुसुलीत केस कोणाला नको असतात? म्हणूनच तुमचे केस अधिक आकर्षक करण्यासाठी वापरा कोरफड-दही हेअर मास्क. कोरफडमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे केसांना पूर्ण पोषण देण्यास मदत होते. तर दुसरीकडे दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. तर हा हेअर मास्क वापरल्याने तुमच्या केसांनाही चमक आणि स्निग्धता येणाया मदत होईल, तर जाणून घेऊया कोरफड-दही हेअर मास्क कसा तयार करावा.

हेअर मास्कसाठी लागणारे साहित्य-
कोरफड
दही 2 ते 4 चमचे

कोरफड-दही हेअर मास्क कसा बनवावा?

कोरफड-दही हेअर मास्क बनवण्यासाठी आधी एक वाटी घ्या.
मग त्यात कोरफडीच्या पानातून ताजे जेल काढून टाका.
यानंतर त्यात साधारण २ ते ४ चमचे दही घालून
मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. तर आता तुमचा कोरफड-दही हेअर मास्क तयार आहे.

कोरफड-दही हेअर मास्क कसा लावावा?

कोरफड-दही हेअर मास्क घ्या आणि टाळूपासून लांबीपर्यंत चांगले लावून घ्या.
त्यानंतर तुम्ही हा मास्क केसांमध्ये सुमारे 15 ते 20 मिनिटे ठेवा. त्यानंतर माइल्ड शॅम्पू आणि कंडिशनरच्या मदतीने केस धुवून टाका.
मग तुम्हाला दिसेल की तुमचे केस कोरडे झाल्यानंतर मऊ आणि चमकदार झालेले जाणवतील

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version