सह्याद्री अतिथीगृहावर तातडीची बैठक

सह्याद्री अतिथीगृहावर तातडीची बैठक

मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळण्यात आली आहे, त्यामुळे मराठा आरक्षणचा मुद्दा पुन्हा अधांतरी राहिला आहे. तर दुसरीकडे मराठा समाज पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. या सर्व घडामोडीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर आले आहे. त्यांनी तातडीने सर्व मंत्र्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश दिले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने जून २०२१मध्ये मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यासाठी लागेल ते करू, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर दिली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळल्यानंतर दिली. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री अलर्ट मोडवर असून त्यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षण समितीतील महत्त्वाचे नेते आणि काही मंत्र्यांना देखील तातडीने मुंबईत पोहोचण्याचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मुद्द्यावर संपूर्ण आढावा घेणार आहेत.

सर्व कार्यक्रम रद्द करून दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईत पोहचा असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच सर्व मंत्री आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत. आज दुपारी एक वाजेपर्यंत सर्व मंत्री मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिमध्ये सर्व मंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. तातडीने बैठक का बोलावण्यात आली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version