‘इथे’ बैलपोळ्याला होते गाढवांची पूजा!

‘इथे’ बैलपोळ्याला होते गाढवांची पूजा!

श्रावणामध्ये साजरा होणारा एक सण म्हणजे बैलपोळा. शेतकऱ्यांच्या दृष्टीने या सणाला फार महत्त्व असतं. या दिवशी शेतात बळीराजासोबत राबणाऱ्या बैलांची पूजा केली जाते. त्यांना सजवलं जातं. सुवासिनी त्यांना ओवाळतात, पुरणपोळीचा नैवेद्य भरवतात. नवीन झुल पांघरतात. बैलाप्रती कृतज्ञता म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र अकोला जिल्ह्यात बैलाप्रमाणे चक्क गाढवांचा पोळा साजरा केला जातो.

 

अकोला जिल्ह्यातील अकोट येथे वृषभ राजाच्या पोळ्या बरोबर चक्क गर्दभ राजाचा म्हणजेच गाढवाचा पोळा साजरा करण्यात आला. ज्या प्रमाणे वर्षभर शेतकऱ्याच्या शेतात आपल्या मालकासाठी बैल राबतो, त्याचप्रमाणे भोई समाजाच्या बांधवांना गाढव हे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मेहनत करतं. त्यांच्यासोबत गाढवंही वर्षभर राब राब राबतात. त्यामुळे बैलांप्रमाणे पोळ्याच्या दिवशी गाढवांनाही आंघोळ घालून त्यांना सजवले जाते. तोरणाखाली उभं करून त्यांचीही पूजा केली जाते.

 

गाढव या प्राण्याला नेहमी मठ्ठपणाचं प्रतिक मानण्याचा प्रघात आहे. एखाद्या निर्बुद्ध व्यक्तीची तुलना करताना गाढवाचंच उदाहरण दिलं जातं. मात्र ओझी वाहून नेणाऱ्या गाढवाचं पूजन करून त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही उत्सवी प्रथा मात्र आभावानेच पाहायला मिळते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version