उदयनराजेंनी राजीनामा देऊन नागरीकांना त्रास देऊ नये – आठवले

उदयनराजेंनी राजीनामा देऊन नागरीकांना त्रास देऊ नये – आठवले

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे यांनी राजीनामा देऊन नागरीकांना त्रास देऊ नये अशी मिश्किल टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच उदयनराजे जरी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असले तरी ते भाजपासोबत असल्याचेही आठवले म्हणाले.

काय म्हणाले रामदास आठवले ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले EVM च्या मुद्द्यावर आक्रमक झाले होते.

मी साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा देतो.

निवडणूक आयोगाने साताऱ्यात बॅलेट पेपरवर फेरनिवडणूक घ्यावी,’ असं साताऱ्याचे खासदार रामदास आठवले यांनी सांगितले.

त्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उदयनराजे यांना राजीनामा देऊ नये असा सल्ला दिला.

त्याचबरोबर राजीनामा देऊन नागरीकांना त्रास देऊ नये असेही त्यांनी म्हटलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष कमळ चिन्हावर लढणार नसून स्वतंत्र लढणार असल्याचे म्हटलं.

तसेच उदयनराजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असले तरी भाजपासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version