विमानतळ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवजयंतीची जय्यत तयारी

विमानतळ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवजयंतीची जय्यत तयारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आज शिवजयंती निमीत्त आज सर्व शिवभक्त ठिक-ठिकाणी शिवजयंती साजरी करताना दिसत आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शिवशाही अवतरलेली दिसत आहे. विमानतळ परिसरात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवजयंती सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात येणार आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्यासमोर रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. एका बाजूला महाराजांची मेघडंबरी आणि समाधी असा भव्य सेट तयार करण्यात आला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून आज तिथीनुसार शिवजयंती शिवसेनेकडून साजरी केली जाणार आहे.

यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर तसेच शिवसेनेचे अन्य नेते मोठ्या संख्येने उपस्थित होणार आहेत. भगवे झेंडे, पताके, तुताऱ्या, ढोल-ताशे यांच्या गजरात शिवजयंती साजरी होणार आहे. त्यासाठी तब्बल 100 ढोल पथकांचे आयोजन केले असून 388 व्या शिवजयंतीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. आज जागो-जोगी शिवजयंती निमीत्त वेगवेगळे कार्यक्रम पहायला मिळणार आहे्त.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version