वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. यू. राव यांचे सोमवारी पहाटे बंगळुरूमध्ये निधन झाले.
यू. राव हे 87 वर्षांचे होते. हृदयाच्या व्याधीमुळे काही दिवसांपूर्वी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
अखेर पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. भारताचा पहिला उपग्रह असलेल्या ‘आर्यभट्ट’च्या निर्मितीत राव यांचे मोठे योगदान होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.