Nagpur Crime : नागपूर हादरलं! काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर मध्यरात्री फायरिंग; घराच्या काचा फुटल्या, संपूर्ण कुटुंब घरी अन्…

नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. नागपूरमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर फायरिंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nagpur Crime : नागपूर हादरलं! काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर मध्यरात्री फायरिंग; घराच्या काचा फुटल्या, संपूर्ण कुटुंब घरी अन्…

नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. नागपूरमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर फायरिंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री दोन अज्ञातांकडून अचानक फायरिंग करण्यात आली. स्वामिनारायण मंदिर, वाठोडा परिसरातील शुभम मोटघरे हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यांच्या घरावर अचानक फायरिंग झाल्याची घटना घडली.

हेही वाचा- Nanded Crime : नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा! नात्याने ‘बाबा’ म्हणायची, त्या नराधमानेच दोन वर्षांच्या चिमुकलीवर केला अत्याचार

दरम्यान फायरिंगच्या वेळेस नगरसेवक शुभम मोटघरे आणि त्यांचा परिवारासोबत घरी होता. मात्र सुदैवाने या फायरिंगमध्ये कोणीही जखमी नाही, तर घराच्या काचा फुटल्यामुळे घराचे नुकसान झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. बाईकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी मोटघरे यांच्या घरावर गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला.

यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर दिसून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु असून पोलीसांचे विशेष पथक आरोपीचा शोध घेत आहे. गोळीबार का करण्यात आला? त्या मागं नेमकं कारण काय होतं? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version