नक्षलवादी हल्ल्यात दोन पोलिस शहीद

नक्षलवादी हल्ल्यात दोन पोलिस शहीद

गोंदिया व छत्तीसगड बॉर्डरवर साेमवार पोलिस आणि नक्षलांची चकमक झाली. या नक्षली चकमकीत छत्तीसगड येथील दोन पोलिस शहीद झाले. महाराष्ट्र – छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गत सोमवारी सकाळी माओवाद्यांनी विनाशास्त्र असलेल्या दोन पोलिसांना ठार केले. या घटनेनंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून जंगलात शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह आणि ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह चहा पिण्यासाठी पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्याकडे गेले असता या परिसरात आधीच दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी यांच्यावर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिसरा जखमी असून नक्षलवाद्यांनी मोटारसायकलला आग लावली. त्यानंतर ते घटनास्थळावरुन पसार झाले आहे. या घटनेनंतर गोंदिया पोलीस व छत्तीसगड पोलीस जंगलात सर्च ऑपरेशन करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version