पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येडे निपाणी फाट्याजवळ श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात दोन इनोव्हा कारची जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार 5 ते 6 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी इनोव्हा कार क्रमांक एमएच 10 बीएम 7080 ही महामार्गावरून जात असताना अचानक तिचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार अलीकडील लेनमधून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या बाजूला गेली.
हेही वाचा- Shocking! ज्या मुलाचे केले अंत्यसंस्कार तोच… तुरुंगातून आलेल्या फोनने कुटुंब चक्रावले
यावेळी समोरून येणाऱ्या इनोव्हा कार क्रमांक एमएच 10 बीएम 7561 ला या कारने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामध्ये 5 ते 6 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली असून, घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अपघातातील जखमींची संख्या आणि त्यांची प्रकृती याबाबत अधिकृत माहिती पोलिसांकडून मिळाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.