अणदुरच्या खंडोबा यात्रेस सुरुवात, भाविकांसाठी सजल्या बाजारपेठा

अणदुरच्या खंडोबा यात्रेस सुरुवात, भाविकांसाठी सजल्या बाजारपेठा

जय महाराष्ट्र न्यूज, तुळजापूर

मराठवाडयातील प्रमुख खंडोबाच स्थान असलेले अणदुरमध्ये असून चंपाषष्टी निमित्त खंडोबा यात्रेस रात्री पासुन सुरुवात झाली आहे. पहाटे खंडोबाची मूर्ति पालखीतून वाजत गाजत मैलारपुरच्या मंदिरात ठेवली आहे. त्यानंतर आता पुढील पावने दोन महिने हि मूर्ति मैलारपुरात स्थानपन्न राहील.

जानेवारी महिन्यात मोठी यात्रा भरते आणि पुन्हा हिच मूर्ति आणदुरच्या मंदिरात सव्वा दहा महिन्यासाठी ठेवली जाते. देशात हे एकमेव उदाहरण असेल जिथे मूर्ति देण्याघेण्याचा करार दोन गावामध्ये होत आहे. खंडोबाचे एकूण १२ स्थान आहेत त्यांपैकी अणदूर हे एक आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version