Tukaram Mundhe FDA Action : मुंबईत तुकाराम मुंढेंची करडी नजर! मॅकडोनाल्डसह 13 प्रसिद्ध रेस्टॉरंट्सवर FDAची धडक कारवाई

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई सुरू आहे. अशातच तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली.
Tukaram Mundhe FDA Action : मुंबईत तुकाराम मुंढेंची करडी नजर! मॅकडोनाल्डसह 13 प्रसिद्ध रेस्टॉरंट्सवर FDAची धडक कारवाई

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई सुरूच आहे. अशातच तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाने कुलाबा येथील मॅकडोनाल्डचा परवाना रद्द केला आहे. कुलाबा येथील मॅकडोनल्ड्स कियोस्कच्या तपासणीदरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाला ( FDA ) अनेक त्रुटी आढळल्या. त्यानुसार, कुलाबा येथील मॅकडोनाल्ड्सच्या एका किऑस्कने 20 पैकी 18 सुरक्षा मानकांची पूर्तता केली नव्हती.

हेही वाचा- Bombay Presidency Radio Club: मुंबईतील प्रसिद्ध रेडिओ क्लबवर FDAचा छापा; किचनमध्ये माशांचा प्रादुर्भाव, लायसन्स तात्काळ निलंबित
तसेच 148 पानांचा खोटा शिस्तपालन अहवाल सादर केल्याबद्दल आणि मेन्यूमध्ये उल्लेख न करता फसवणुकीने एनालॉग चीज वापरल्याबद्दल एफडीएने FSS कायदा 2006 अंतर्गत असलेले परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. यावेळी सर्व कायदेशीर बंधनकारक नियमांचे पालन सुनिश्चित होईपर्यंत, अन्न आणि पेयांचे उत्पादन, विक्री आणि वितरण यावर बंदी घातली आहे. याशिवाय कुलाबामध्ये एफडीएने रेडिओ क्लब, स्टेटस रेस्टॉरंटसह 13 फूड आस्थापनांचे लायसन्स रद्द केले आहे.

मुंबईतील प्रसिद्ध रेडिओ क्लबचा लायसन्स तात्काळ निलंबित
मुंबईतील प्रसिद्ध द बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब लिमिटेडवर FDAने मोठी कारवाई केली आहे. किचनमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्यानंतर क्लबचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. FDAच्या तपासणीत रेडिओ क्लबकडून तब्बल 47 टक्के अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असल्याने अन्नसुरक्षा आणि मानके कायदा 2006 मधील कलम 32(3) आणि संबंधित नियमांनुसार क्लबचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version