नांदेड : ट्रक आणि मॅजिक ऑटोच्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तर या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदेड ते भोकर रस्त्यावरच्या वाकद गावाजवळ आज, गुरुवारी सांयकाळी हा अपघात घडला. यातील जखमींना भोकर आणि नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
सविस्तर माहिती अपडेट होत आहे…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.