‘फन्ने खां’चा ट्रेलर रिलीज, तुम्ही नक्कीचं व्हाल इमोशनल…

‘फन्ने खां’चा ट्रेलर रिलीज, तुम्ही नक्कीचं व्हाल इमोशनल…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अनिल कपूर आणि ऐश्वर्या रायच्या ‘फन्ने खां’ या सिनिमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिटं 41 सेकेंदचा हा ट्रेलर प्रेक्षकांना भावुक करणारा आहे. यामध्ये ‘फन्ने खां’ अर्थात अनिल कपूरची कथा दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये तो स्वता: ऑर्केस्ट्रामध्ये गाणी गातं असतो.

मात्र, आपल्या मुलीला एक मोठी गायिका बनवण्याचे त्याचे स्वप्न असते आणि आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो फन्ने खां अभिनेत्री बेबी सिंह अर्थात ऐश्वर्या रायचे अपहरण करतो. या सिनेमाची कथा अशा फन्ने खांची आहे ज्याने या नावाची कथाच बदली आहे.

या सिनेमासह ऐश्वर्या राय 2 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये पुन्हा परतली आहे. या सिनेमा निमित्त ऐश्वर्या राय आणि अनिल कपूरची जोडी प्रेक्षकांना खुप वर्षानंतर पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘फन्ने खां’ हा सिनेमा 3 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version