टोलमाफीचे पैसे नागरिकांच्याच खिशातून- माहितीच्या अधिकारात उघड

टोलमाफीचे पैसे नागरिकांच्याच खिशातून- माहितीच्या अधिकारात उघड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील सुमारे 55 टोलनाक्यांवर टोलमाफी देऊन आश्वासनाची पूर्ती केल्याचं ढोल सरकारकडून वाजविण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांच्याच पैशातून या टोलमाफीची भरपाई म्हणून दरवर्षी ठेकेदारांना कोट्यवधींची खैरात दिली जात असल्याचं उघड झालं.

 

तसंच रकमेमध्ये मोठी वाढ केली जात असल्यानं टोलमाफीसाठी दाखविल्या जाणाऱ्या वाहनांच्या संख्येबाबतही शंका निर्माण होत आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून ही बाब स्पष्ट झाली. संबंधित टोलचा करार संपेपर्यंत ही रक्कम ठेकेदारांना दिली जाणार आहे.

 

टोलमाफीपोटी ठेकेदारांना दिलेली रक्कम

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलसाठी…
२०१५-१६ मध्ये ७२ कोटी,
२०१६-१७ मध्ये ८७ कोटी.

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोलसाठी
२०१५-१६ मध्ये १५ कोटी
२०१६-१७ मध्ये ३० कोटी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version