Manoj Jarange Patil : जरांगेंचे नवव्या दिवशीही उपोषण सुरूच, तर मुंबईला कधीही येऊ शकतो; पोलिसांना पत्राद्वारे इशारा

Manoj Jarange Patil : जरांगेंचे नवव्या दिवशीही उपोषण सुरूच, तर मुंबईला कधीही येऊ शकतो; पोलिसांना पत्राद्वारे इशारा

अंतरवाली सराटी : मराठ्यांच्या लढ्यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. सरकार कार्यवाही करत नसल्याने जरांगे पाटलांनी पुन्हा सलाईन, पाणी उपचार घेणं बंद केले आहे. शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर महत्वाचे निर्णय समोर आले. सारथी अंतर्गत परदेशात शिक्षण घेणाऱ्यांच्या खर्चाची आधीची मर्यादा हटवली. तर मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, SEBC प्रमाणपत्र वाटपाची महिनानिहाय माहिती सादर करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान मंडळ स्तरावर शिबिर आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांना मराठा आंदोलकांनी नवे पत्र दिले असून दिलेल्या वेळेत प्रश्न न सुटल्यास आंदोलनासाठी मुंबईत येणार असल्याचा पत्रात उल्लेख केला आहे. 

हेही वाचा : Nana Patole : ‘लाडक्या बहिणींना बेईमान भावांनी फसविले’; आमदार नाना पटोलेंचा सरकारवर हल्ला

दरम्यान, अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असतानाच आता मुंबईत मराठा आंदोलनाची तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलनाचे गंगाधर काळकुटे यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्याला पत्र दिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईला कधीही येऊ शकतो, असा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर हे पत्र देण्यात आलं असून, 12 सप्टेंबरनंतर मराठा समाज कधीही आझाद मैदानावर धडकू शकतो, असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईतील संभाव्य मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिसांची काय भूमिका असणार, याकडे लक्ष लागलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version