Nagpur News : नागपूरमधील 18 नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल, सर्व शाळांना सुट्टी जाहीर; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Nagpur News : नागपूरमधील 18 नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल, सर्व शाळांना सुट्टी जाहीर; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नागपूर : नागपूर शहरातील 18 नामांकित शाळांसोबतच थेट जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल आला आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व्यवस्थापनाने आज, सोमवारी विद्यार्थ्यांना अचानक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच पोलीस प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व संबंधित शाळा आणि शासकीय इमारतींच्या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट रोजी नागपुरातील 18 प्रमुख शाळांना आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला एक अत्यंत संशयास्पद ई-मेल प्राप्त झाला होता. या ई-मेलमध्ये शाळांच्या इमारती आणि जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची थेट धमकी देण्यात आली होती. या धमकीमध्ये 31 ऑगस्ट या तारखेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. आज हीच तारीख असल्याने सुरक्षेचा कोणताही धोका न पत्करता शाळा प्रशासनाने तातडीने सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल बस ट्रकमध्ये घुसली; एकाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version