क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसबीच्या रडारवर आहे. मात्र अखेर आर्यनचा जामीन उच्च न्यायलयाने मंजूर केला असून आर्यनची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. क्रुझवरील ड्रग्जप्रकरणाची तपासणी मुंबई विभाग एनसीबीचे संचालक समीर वानखेडे करत होते. मात्र आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढण्यात आला आहे. आता एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंह हे आर्यन खानची चौकशी करणार आहेत.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खानच्या चौकशी समीर वानखेडे करत होते आता मात्र आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढण्यात आला. यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट केले की, ‘ही तर फक्त सुरुवात आहे. व्यवस्था सुधारण्यासाठी अजून बरेच काही करण्याची गरज आहे. समीर वानखेडे यांच्याकडील २६ प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे.’ अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली आहे.
समीर वानखेडेंकडून आर्यन खानचा तपास काढून घेतल्यावर एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी स्वत: आर्यन खानच्या तपास काढून घेण्याची विनंती केली असल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.