जय महाराष्ट्र न्यूज, बीड
लग्न म्हंटलं की धुमधाम हा असतेच. फटाके आणि एकच जल्लोष असतो. पण बीडमध्ये अवघ्या तीन तासांत एक विवाह सोहळा पार पडला आहे. केवळ 3 तासांच्या या लग्नाचं कारण होत हुंडा आणि त्यामुळे होणारा त्रास.
त्यामुळे या प्रश्नावर तोडगा म्हणून अशा प्रकारचा आगळा वेगळा विवाह करण्यात आला. हा विवाह पाहण्यासाठी बीडच्या सिंहगड लॉन्समध्ये मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी खर्च करण्यापेक्षा साध्या पद्धतीनं विवाह करा असा सल्ला बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.