Western Railway Megablock : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवर तब्बल 60 दिवसांचा ब्लॉक जारी; 2 महिने वेळापत्रकात होणार ‘हे’ बदल

पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने सोमवारी 60 दिवसांचा ब्लॉक जाहीर केला आहे.
Western Railway Megablock : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवर तब्बल 60 दिवसांचा ब्लॉक जारी; 2 महिने वेळापत्रकात होणार ‘हे’ बदल

पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने सोमवारी 60 दिवसांचा ब्लॉक जाहीर केला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 5 च्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यानुसार परराज्यातून मुंबईत आलेल्या एक्सप्रेसचा प्रवास दादर स्थानकात समाप्त करण्यात आला. पुढील दोन महिने गाडयांच्या वेळापत्रकात हा बदल राहणार आहे. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ओखा-मुंबई सेंट्रल ‘सौराष्ट्र मेल’, हजरत निजामुद्दीन-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस (दर बुधवारी व रविवारी), कानपूर अन्वरगंज-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस (दर मंगळवारी), काठगोदाम-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस (दर शुक्रवारी) या गाड्यांचा प्रवास मुंबई सेंट्रलऐवजी दादर स्थानकात समाप्त करण्यात येणार आहे. प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामानिमित्त घेण्यात आलेल्या ब्लॉकनंतर त्यापाठोपाठ लगेचच मुंबई सेंट्रल स्थानकात 60 दिवसांचा ब्लॉक जाहीर करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version