Tukaram Mundhe: मुंढेंच्या रडारवर ‘मोठे मासे’! 30 विशेष अधिकारी आणि 40 पोलिसांच्या धाडीत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

राज्यभर कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री करणाऱ्या जाळ्यावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली.
Tukaram Mundhe: मुंढेंच्या रडारवर ‘मोठे मासे’! 30 विशेष अधिकारी आणि 40 पोलिसांच्या धाडीत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात विविध ठिकाणी धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान अन्नपदार्थ तयार करणारे आणि विक्री करणारे विविध व्यावसायिक आस्थापना, गोदामे तसेच वितरण केंद्रांची पाहणी करण्यात आली. यावेळी राज्यभर कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री करणाऱ्या जाळ्यावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी टाकलेल्या धाडीत तब्बल 1 कोटी 47 लाख 93 हजार 945 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून 20 हजार लिटर संशयित दूध नष्ट केले. 

हेही वाचा- Ahmedabad Serial Blasts: अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट; हायकोर्टाकडून 38 दहशतवाद्यांची फाशीची शिक्षा कायम

यावेळी तपासात दूध भुकटी, व्हे किंवा डेअरी पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल यांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे निष्पन्न झाले. या भेसळयुक्त साहित्याचा पुरवठा मुख्यत्वे पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातून होत असल्याचे समोर आले आहे. तपासात मंचर येथील सुशांत हिंगे हा मुख्य सूत्रधार असल्याचे, तर संदीप लोढा हा या व्यवहारातील सल्लागार असल्याचे आले समोर आहे. शेतकरी, दूध संकलन केंद्रे आणि मोठ्या पॅकिंग केंद्रांना नियमितपणे भेसळयुक्त साहित्य पुरवले जात असल्याचेही तपासात उघड झाले. 

या मोहिमेसाठी सुमारे 30 अन्न सुरक्षा अधिकारी आणि 40 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणी 26 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 13 आरोपींना अटक केली असून आरोपींना पुरावे नष्ट करण्याची किंवा फरार होण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या प्रकरणात एकूण 13 आस्थापनांवर धाडी टाकून 49 नमुने संकलित करण्यात आले. या कारवाईत भेसळीच्या संपूर्ण पुरवठा साखळी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version