‘परबांची रस्सी जल गई, पर बल नही गया’

‘परबांची रस्सी जल गई, पर बल नही गया’

वांद्रे पूर्वीकडील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अनधिकृत शाखा मुंबई महापालिकेने पाडली. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फोटो शाखेत लावलेला असूनही शाखा तोडलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करीत संतप्त शिवसैनिकांनी संबंधित अभियंत्याला मारहाण केली. माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. त्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ॲड. अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल परबांची “रस्सी जल गई, पर बल नहीं गया!” कायदेतज्ज्ञ ॲड. अनिल परब यांनी कायद्याला न जुमानता महापालिका कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण केली. अशा वृत्तीचा निषेध करायलाच पाहिजे. अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा चुकीचा पायंडा ठाकरेंकडून पाडला जात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच, अनिल परब यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version