सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

भारताचे सरंक्षणदलाचे प्रमुख सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचे तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

‘तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे मी दु:खी आहे. या अपघातात लष्करप्रमुख बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि इतर अधिकाऱ्यांचे निधन झाले आहेत. त्यांनी तत्परतेने भारत देशाची सेवा केली आहे. या संकटात मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे’, असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुख:द भावना व्यक्त केल्या आहेत.

‘लष्करप्रमुख बिपीन रावत हे उत्कृष्ठ सैनिक होते. रावत यांनी सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिपीन रावत यांच्या निधवार दु:ख व्यक्त केले आहे. ‘सीडीएस बिपीन रावत यांचे निधन म्हणजे देशासाठी अतिशय दु:खद दिवस’ असल्याचे अमित शहा म्हणाले.

ते म्हणाले, ‘देशासाठी अतिशय दु:ख दिवस आहे. आम्ही आमचे सीडीएस बिपीन रावत यांना दु:खद अपघातात गमावले. ते शूर सैनिकांपैकी होते, ज्यांनी अंत्यंत निष्ठेने मातृभूमीची सेवा केली. त्यांचे अनुकरणीय योगदान आणि वचनबद्धता शब्दात मांडता येणार नाही.’ अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दु:खद भावना व्यक्त केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version