Sonam Dongre Case : सोनम डोंगरे मृत्यूप्रकरणी डॉक्टरांना क्लीनचिट; अ‍ॅलर्जी आणि उलटीमुळे मृत्यू झाल्याचे चौकशी अहवालात नमूद

Sonam Dongre Case : सोनम डोंगरे मृत्यूप्रकरणी डॉक्टरांना क्लीनचिट; अ‍ॅलर्जी आणि उलटीमुळे मृत्यू झाल्याचे चौकशी अहवालात नमूद

नवी मुंबई : सोनम डोंगरे मृत्यूप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा चौकशी अहवाल समोर आला आहे. महापालिका आयुक्तांनी हा अहवाल सभागृहासमोर मांडला असून धक्कादायक माहिती दिली. चौकशी समितीने जे. जे. रूग्णालयाने सादर केलेला शवविच्छेदन रिपोर्ट, वापरलेल्या औषधांचा तपशील, त्यावरील मुद्रीत माहिती, कालबाह्य होण्याचा दिनांक, प्रसुतीगृह आणि अवलंबलेली औषध प्रणाली यांचा सर्वागीण अभ्यास करून हा अहवाल सादर केला आहे. यामध्ये नमूद करण्यात आले की, सोनम डोंगरे यांना डेक्सामेथासोन या इंजेक्शनची तीव्र प्रतिकूल औषधाची प्रतिक्रिया झाली. तसेच अन्न श्वासनलिकेत गेल्याने गुंतागुंत वाढली. सोनम डोंगरे यांचा मृत्यू औषधाच्या ॲनाफिलेक्टिक प्रतिक्रियेमुळे झाला असून, यात डॉक्टरांचा कोणताही निष्काळजीपणा आढळलेला नाही, असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास शिंदे आणि सभागृह नेते सागर नाईक यांनी दिली.

हेही वाचा : Kalyan Crime : प्रियकराची हत्या करून प्रेयसी फरार, मृतदेह कुजावा म्हणून नळ सुरू; पण ‘त्या’ एका व्हाईस मेलने प्लॅन फसला

काय आहे प्रकरण 

नवी मुंबईतील ऐरोलीच्या शासकीय रुग्णालयात 8 महिन्यांच्या गर्भवती सोनम डोंगरे हीचा काही दिवसांपूर्ण दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच दुसऱ्या गर्भवती रिचा मिश्रा यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघींना ऐरोली मनपा रुग्णालयातून वाशी येथील मनपा संदर्भ रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतू इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता. 

सोनम डोंगरे यांचे पती करण डोंगरे यांनी म्हटले होते की, “आम्ही सोनमला प्रसूतीसाठी ऐरोलीच्या महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला कोणता तरी चुकीचा डोस दिला, ज्यामुळे तिची तब्येत अचानक बिघडली. आम्ही विचारणा केली असता, डॉक्टर आम्हाला तब्बल तीन तास तिथेच थांबवून ठेवून ‘तिची तब्येत व्यवस्थित आहे’ असे खोटे सांगत राहिले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर त्यांनी तीन तासांनी तिला वाशी येथील महापालिका रुग्णालयात हलवण्यास सांगितले. आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा वाशीतील डॉक्टरांनी काही वेळातच सोनम आणि पोटातील बाळाला मृत घोषित केले. ऐरोलीतील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे”, असा आरोप मृत महिलेच्या पतीने केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version