मुंबई : मुंबई महानगरपालिकेत आतापर्यंत चार नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. मात्र अद्याप नवीन नावांची घोषणा झालेली नाही. येत्या सोमवारी विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा पालिका सभागृहात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यापूर्वी 227 पैकी चार नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे.
1. प्रभाग क्र. 138 च्या 'एमआयएम'च्या नगरसेविका रोशन शेख
2. भांडुप प्रभाग क्र. 111 मधील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक दीपक राजाराम सावंत
3. गोवंडी येथील प्रभाग क्र. 137 मधील 'एमआयएम'चे नगरसेवक शमीर रमजान पटेल
4. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या कुर्ला येथील प्रभाग क्र. 170 नगरसेविका बुशरा कप्तान मलिक
अशा चार नगरसेवकांचा यात समावेश आहे.
यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले असले तरी अजूनही नवीन नावांची घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. चार नगरसेवकांपैकी बुशरा मलिक यांनी पुढील प्रक्रियेला न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे. अशा प्रकरणांमध्ये शक्यतो दुसऱ्या क्रमांकाची मते मिळणाऱ्या उमेदवाराला संधी मिळू शकते. मात्र त्याकरीता त्या उमेदवाराला लघुवाद न्यायालयात दाद मागावी लागते. लघुवाद न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे अद्याप कोणत्याच नवीन नगरसेवकाच्या नावाची घोषणा झालेली नाही. विशाखा राऊत यांच्या प्रभागात प्रिया सरवणकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांनी लघुवाद न्यायालयात धाव घेतलेली आहे. मात्र अद्याप त्याबाबत निर्णय आलेला नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.