तब्बल १११ दिवसानंतर देशात सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद …

तब्बल १११ दिवसानंतर देशात सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद …

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. मंगळवार पासून देशात ३४ हजार ७०३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा आकडा १११ दिवसातील सर्वात कमी आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, १०१ दिवसानंतर भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या सर्वात खालच्या स्तराला गेली आहे. देशात सध्या ४ लाख ६४ हजार ३५७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. देशात सध्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी १.५२ टक्के सक्रिय रुग्ण आहेत.
मंगळवार पासून ५१ हजार ८६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली . गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सलग ५४ दिवसांपासून ही संख्या जास्त नोंदवण्यात आली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचा दर ९७.१७ टक्के झाला आहे. पॉझिटिव्ह रेटही पाच टक्क्यांपेक्षा कमी नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे देशातील कोरोना आकडेवारी स्थिरतेकडे जात असल्याचं दिसून येत आहे .
देशात जीवघेण्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मंदावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version