आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या उपस्थित नवी दिल्लीत आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मान्सून 2026 बाबत चिंताजनक माहिती देणारा अंदाज व्यक्त केला आहे. देशात यंदा दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 92 टक्के पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. हा पाऊस सामान्य सरासरीपेक्षा कमी पावसाच्या श्रेणीत मोडते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम रविचंद्रन यांनी पहिल्यांदाच असा अंदाज वर्तावला आहे ज्यात शेती, जलाशय पातळी आणि ग्रामीण मागणीवर यांचा गंभीर परिणाम उद्धवू शकतो.
यंदा पावसाचा सरासरी अंदाज काय?
भारतीय हवामान विभागाच्या व्याख्येनुसार, यात जेव्हा पावसाचे प्रमाण 90 टक्के ते 95 टक्के असते त्यावेळी सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. तसेच दीर्घकालीन सरासरीच्या 96 ते 104 टक्के पडणारा पाऊस सामान्य सरासरी इतका मानला जातो. तर 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो. ही सरासरी 50 वर्षांच्या हंगामी सरासरीवर आधारित असून ती 87 सेंटीमीटर आहे. यंदाचा पावसाचा अंदाज तर 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या मर्यादेच्या खाली असल्याने तो सरासरीपेक्षा कमी ठरतो.
हेही वाचा- Weather Update: आता दुपारीची काळजी घ्या! अवकाळीचं संकट गेलं, पण…; आज IMD चा काय इशारा?
एल निनोचे सावट
जून ते सप्टेंबर दरम्यान येणारा नैऋत्य मोसमी पाऊस भारताच्या शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर महिन्यात एल निनो परिस्थिती असणार आहे, म्हणजेच कमी पाऊस किंवा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यात आहे. शेतजमिनीला सिंचनासाठी या पावसावर अवलंबून राहावे लागते. तूट असलेल्या हंगामात भात, डाळी आणि तेलबियांसारख्या पावसावर अवलंबून असलेल्या पिकांच्या उत्पादनावर थेट परिणाम होतो आणि त्यामुळे अन्नधान्य महागाईतही भर पडू शकते. मात्र जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये भारतीय समुद्रात सकारात्मक परिस्थिती असल्याने एल निनोचा परिणाम जाणवणार नसल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
एल निनो म्हणजे काय?
एल निनो ही मध्य आणि पूर्व-मध्य विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त होणारी एक नैसर्गिक हवामान घटना आहे. ही घटना दर 2 ते 7 वर्षांनी घडते आणि जागतिक हवामान, वारे व पर्जन्यमानावर परिणाम करते. यामुळे भारतात बहुधा कमी पाऊस किंवा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते.
शेतकऱ्यासह भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका
कमी पावसामुळे शेतीसह जलाशयाची पातळी घसरण्याचे, ग्रामीण मागणीवर परिणाम, अन्नधान्य महागाई आणि आर्थिक विकासावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यावेळी कमी पाऊस पडल्यास, शेतीला मोठा फटका बसू शकतो. यामुळे भाजीपाला भात, डाळी, तेलबिया यांच्या उत्पादनात पुरवठा घटल्याने किमती वाढण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होऊ शकतो. तसेच पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी कमी होईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मंदावेल त्याचसोबत लोकांचे बजेट कोलमडू शकते. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.