देशात कोरोनाची चौथी लाट?

देशात कोरोनाची चौथी लाट?

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र, पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही राज्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये राज्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. दिल्ली, हरियाणा, गुजरातसह इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रामध्ये कोरोना निर्बंध लागू करण्याच्या तसेच लसीकरणावर भर देण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांचा आलेख वरचढ आहे. दिल्लीत मागील चार आठवड्यांपासून रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. मंगळवारपासून करोनाचे ६००हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट ७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

‘या’ राज्यांना केंद्राचे पत्र

देशात कोरोना रुग्णांचा चढता आलेख पाहता, केंद्राने काही राज्यांना पत्र पाठवले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिले आहे. राज्यांनी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आवश्यक निर्णय घेत सतर्क राहण्याच्या सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version