मंत्रिमंडळ बैठकीत नियमबद्ध नामांतराचा निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीत नियमबद्ध नामांतराचा निर्णय

नामांतरावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले होते . औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव दि.बा.पाटील या नामांतराची आम्ही शनिवारी घोषणा करणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केले होते. त्याच मुद्द्यावर आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली या बैठकीत नियमबद्ध नामांतराचा निर्णय घेण्यात आला. या बैठकी नंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेत काही घोषणा केल्या आहेत. फडणवीस-शिंदे सरकारची शनिवारी तिसरी मंत्रीमंडळ बैठक आहे. तर या बैठकीत शिंदे फडणवीस यांच्याकडून औरंगाबादचे नियमबद्ध नामांतर करण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत नियमबद्ध नामांतराचा निर्णय घेण्यात आला आहे.मविआकडून औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराची नियमबाह्य प्रक्रिया करण्यात आली होती त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराचा नियमबद्ध निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबई विमानतळाला ठाकरेंऐवजी दिबांचे नाव राहील स्थानिकांच्या भावनेला लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत .तर मुंबईत पायाभूत सुविधा वाढीचे बैठकीत निर्णय घेतले आहेत असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. पायाभूत सुविधांसाठी साथ हजार कोटी रुपये कर्ज मंजुरी देखील देण्यात आली आहे.पत्रकार परिषदेमध्ये संभाषण करताना उपमुख्यमंत्री यांनी वक्तव्य केले आहे कि मविआने अल्पमतात असताना घेतलेले निर्णय सुधारले आहेत तर त्याच बरोबर नामांतराचा ठराव विधिमंडळात आणणार असे देखील उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत.नियमबद्ध नामांतराच्या निर्णयासोबतच बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. रणजितसिंह डिसले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची यांची देखील भेट घेतली, रणजितसिंह डिसले यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदे मध्ये म्हणाले आहेत. पत्रकार परिषद मध्ये बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे . राऊतांना सकाळी उठून फक्त बोलण्याचे काम आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना टोमणा मारला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version