‘कोरोनास्थिती पाहून अधिवेशनाचा निर्णय घेतला जाईल’ – अजित पवार

‘कोरोनास्थिती पाहून अधिवेशनाचा निर्णय घेतला जाईल’ – अजित पवार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. पुणे महापालिका आयुक्त, महापौर, आरोग्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्यानतंर पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत.

कोरोनापरिस्थिती पाहून अधिवेशनाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत चर्चा नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुण्याती शाळा, महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय अजित पवार यांनी दिला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, पालकांचाच असणार असल्याचे ते म्हणाले.

शाळा सुरू करण्याबाबत पुण्यात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, पहिली ते आठवीचे वर्ग चार तास असणार आहेत. तर नववीच्या पुढचे वर्ग पुर्ण वेळ असणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, हा अंतिम निर्णय पालकांचा असणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. संबंधित नियमावली पहिली ते आठवी वर्गासाठी एका आठवड्यासाठी असणार असून १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालयेसुद्धा सुरू होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version