अंबानींच्या घरी पुन्हा हलला पाळणा

अंबानींच्या घरी पुन्हा हलला पाळणा

मुंबई, १ जून २०२३, प्रतिनिधी : उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी हे पुन्हा एकदा आजी आजोबा झाले आहेत. अंबानींच्या घरात नव्या पाहुणीचे आगमन झालं आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका अंबानी हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. त्यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. बाळाच्या येण्याने अंबानी कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आकाश अंबानीची पत्नी श्लोका अंबानी हिने ३१ मे रोजी मुलीला जन्म दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा अंबानी कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. याआधी १० डिसेंबर २०२० रोजी श्लोका आणि आकाश पहिल्यांदा आई-बाबा झाले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version